पालघर जिल्ह्यातील शाळांना २९ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर*
*
जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या आपत्ती परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर 2025 रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. इंदु राणी जाखड यांनी घेतला.
या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, शासकीय व खाजगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, आयुक्त व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्र, आश्रम-निवासी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत.
तथापि, या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी लक्षात घेता सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.
सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.