शांतीवनमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सूर संध्या कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल - जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेलच्या वतीने कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन संचालित रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवरात्रीचे औचित्य साधून २८ सप्टेंबर रोजी मराठी हिंदी गीतांचा सुमधुर कार्यक्रम सूरसंध्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे सदस्य आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तसेच इतर सहयोगी गायकांनी तबला आणि हार्मोनियमच्या साथीने मराठी हिंदी गीते सादर केली. दोन तासाच्या या कार्यक्रमात शेवटच्या अर्ध्या तासात कराओके वर हिंदी गीतेही सादर करण्यात आली.
या कार्यक्रमास वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांनी समरस होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमास कुष्ठरोग निवारण समितीचे कार्याध्यक्ष ॲड प्रमोद ठाकूर हे उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी जाणीव ठेवून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी जाणीव परिवाराचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या वेळी जाणीवचे सदस्य आपल्या परिवार आणि मित्र मंडळीसह उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी तबल्यावर साथ विनायक प्रधान सर यांनी तर हार्मोनियमवर साथ सौ पद्मजा जोशी मॅडम यांनी देऊन जाणीव संस्थेस सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जाणीवच्या प्रकल्प संचालिका प्रतिमा जाधव यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे अतिशय सुन्दर पद्धतीने आणि आपल्या खास शैलीत प्रा. प्रद्न्या जाधव लातूरकर यांनी केले.
जाणीवला सामाजिक कामात नेहमी सहकार्य करणाऱ्या मधुरा तायडे यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला तसेच विनायक प्रधान सर, सौ पद्मजा जोशी मॅडम आणि ॲड प्रमोद ठाकूर यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
जाणीव परिवारातील राजेंद्र जाधव, रुपेश यादव, सौ अरुणा खडताळे, सौ वनिता गोरेगावकर, प्रतिमा जाधव
इतर सहयोगी गायिका
ॲड सुजाता टेकळे, कु आद्या टेकळे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाणीवचे अध्यक्ष विजय गोरेगावकर यांनी केले तर सचिव रुपेश यादव यांनी आभार व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून फळे आणि खाऊ भेट देऊन हा सूरसंध्या कार्यक्रम संपन्न झाला.
-