महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक निधन* *राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर
• Raju pandharinath gade
ठाणे, दि. 28 – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अशाताई आनंतराव पवार यांचे आज खाजगी विमान दुर्घटनेत आकस्मिक निधन झाले. राज्य सरकारतर्फे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे.
सर्व शासकीय कार्यालयांवर 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात येणार आहे. ज्या कार्यालयांमध्ये ध्वज नियमित फडकविला जातो, त्या सर्व इमारतींसाठी हा नियम बंधनकारक राहील. या काळात राज्यात कोणतेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर 28 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती शासनाच्या प्रोटोकॉल विभागाचे अवर सचिव एच. पी. बाविस्कर यांनी अधिकृत पत्राद्वारे दिली.
