माहिती अधिकार दिन’ २९ सप्टेंबर रोजी* *साजरा करण्याचे निर्देश*
*‘
नवी मुंबई (वीमाका)दि.२७ : महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठातर्फे राज्य शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार २८ सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र यावर्षी २८ सप्टेंबर हा दिवस रविवार असल्याने माहिती अधिकार दिन सोमवार दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठाच्या उप सचिव व कार्यालय प्रमुख श्रीमती रीना फणसेकर यांनी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना सर्व शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकार दिनानिमित्त विशेष उपक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश सर्व कार्यालयांना देण्यात आले आहेत. माहिती अधिकार कायदा, २००५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख शासन व्यवस्था नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दिनाचे विशेष महत्त्व असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. माहिती अधिकार कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम, जनजागृती उपक्रम, परिसंवाद, कार्यशाळा व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालयांनी हा दिन औपचारिकरीत्या साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठाच्या उप सचिव व कार्यालय प्रमुख श्रीमती रीना फणसेकर यांनी केले आहे. *********