सुधागड एज्युकेशन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा के आ बांठिया विद्यालयाला ISO मानांकन प्राप्त
पनवेल । प्रतिनीधी
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के आ बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल या विद्यालय अगदी स्थापनेपासून ते आतापर्यंत विद्यालयाने शैक्षणिक स्तरांवरील सर्व उपक्रम, गुणवत्ता यामध्ये अग्रेसर राहिले आहे. शाळेच्या भौतिक सुविधा, गुणवत्ता व आदर्श या सर्वांचा मिलाफ म्हणजे खडज मानांकन .
या मानांकनाच्या वेळी उपस्थित मान्यवर सु.ए.सो.पाली अध्यक्ष मा. गीताताई पालरेचा, बांठिया शाळेचे ज्येष्ठ संचालक मा. श्री. मोती शेठ बांठिया, सु.ए.सो.चे संचालक व कळंबोली विद्या संकुलाचे प्राचार्य श्री राजेंद्र पालवे गटशिक्षणाधिकारी पनवेल माननीय श्री सिताराम मोहिते, रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघ, एन एन पालीवाला जुनियर कॉलेज, इंग्लिश मीडियम के आ बांठिया विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री बी एस माळी सीनियर कॉलेज पालीचे प्राचार्य माननीय श्री लहू पचांग माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ माजी मुख्याध्यापक श्री व्ही व्ही पाटील माननीय श्री विजय नाडे ISO चे हेड ऑफ डिपार्टमेंट महाराष्ट्र राज्य, माननीय श्री प्रकाश जोशी माजी अधिक्षक कळंबोली संकुल, माननीय श्री पंकज भगत अध्यक्ष पनवेल तालुका मुख्याध्यापक संघ, माननीय श्री अंतुले , मुख्याध्यापक माननीय श्री अजय सूर्यवंशी, इतर
शाळांचे सन्माननीय मुख्याध्यापक, सन्माननीय पत्रकार, फोटोग्राफर नाना, विद्यालयाचे उपप्राचार्य श्री आंबरे, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री महाजन पर्यवेक्षक श्री गोखले, पर्यवेक्षिका सौ वेलणकर मॅडम आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित होते. माननीय प्राचार्य माळी सर यांनी ISO मानांकन संदर्भात प्रास्ताविकेतून मानांकनाचे महत्त्व, त्यासाठी घेतलेले परिश्रम याबद्दल माहिती सांगितली. शाळा घेत असलेले शालेय उपक्रम, शालेय पोषण आहार, शालेय भौतिक सुविधा, कार्यालयीन कामकाज, सामाजिक कामे या सर्वांविषयी माहिती सांगून खडज मानांकन कसे प्राप्त झाले याविषयी सांगताना संस्था आणि शाळेतील मुख्याध्यापकापासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच विद्यार्थी, पालक, समाज या सर्वांचा या मानकात कसा सहभाग आहे याविषयी माहिती दिली. या मानांकनासाठी सिंहाचा वाटा असणारे शाळेतील ज्येष्ठ पर्यवेक्षक सन्माननीय श्री बी यू
महाजन यांनी आपल्या मनोगतात ISO मानांकनापर्यंतचा प्रवास सांगितला. ISO चे प्रमुख प्रतिनिधी श्री विजय नाडे यांनी संस्थेच्या माननीय अध्यक्षा व माननीय प्राचार्य यांना ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान केले. मानांकन प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षा सौ गीताताई पालरेचा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल या विद्यालयास हा मानाचा तुरा मिळाला याचा सार्थ अभिमान आहे असे सांगितले. या अभूतपूर्व यशाबद्दल प्राचार्य माळी बी. एस यांना संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा सौ. गीताताई पालरेचा यांनी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. संस्थेचे बीज रोवणारे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै. दादासाहेब लिमये, संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय वसंतशेठ ओसवाल यांचे स्मरण करून सर्वांना मनापासून धन्यवाद देताना त्यांनी गुरुना वंदन केले. सर्वांवर मनापासून शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुनअर कॉलेजचे श्री खरोसे सर, माध्यमिक विभागाच्या सौ. तेजश्री पाटील मॅडम, व इंग्रजी माध्यमाच्या पर्यवेक्षिका सौ. परब मॅडम यांनी केले. ISO कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे सन्माननीय उपप्राचार्य आंबरे यांनी आभार मानले. मोठ्या उत्साहात ISO मानांकन प्रमाणपत्र सोहळा साजरा झाला.