महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी श्रुती शाम म्हात्रे
.
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कट्टर व प्रामाणिक नेते दिवंगत शाम म्हात्रे यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सर्व कामाची दखल घेत तसेच पक्षासाठी दिलेले महत्वाचे योगदान लक्षात घेता श्रुती म्हात्रे यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी करण्यात आली आहे. वरिष्ठ पक्ष श्रेष्टीनी श्रुती म्हात्रे यांच्या नावावर शिक्का मोर्तब केला आहे.काँग्रेस पक्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या व वयक्तिक स्वार्थ न बघता समाजहीत, पक्ष हित डोळ्यासमोर ठेऊन नेहमी कार्यरत असणाऱ्या व काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक संप आंदोलन, मोर्चा बैठका मध्ये नेहमी सहभागी होणाऱ्या व अन्याया विरोधात नेहमी आवाज उठविणाऱ्या, गोर गरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रुती म्हात्रे यांची निवड काँग्रेस पक्षाच्या सचिव पदी झाल्याने काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण असून काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. श्रुती म्हात्रे यांचे सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे समन्वयक गणेश पाटील यांची नवनिर्वाचित कार्यकारी समिती सदस्य तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर .सी .भाई घरत यांच्या समवेत श्रुती शाम म्हात्रे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी श्रुती शाम म्हात्रे यांची निवड केल्याबद्दल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, सह प्रभारी बी .एम .संदीप , व्यंकटेशजी , म.प्र.काँ. क. ओबीसी अध्यक्ष भानुदास माळी आणि इतर वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना भेटून श्रुती म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
या बाबतीत श्रुती म्हात्रे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आत्ताच जाहीर झालेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ची नवीन कार्यकारणी जाहीर झाली.महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी माझी निवड केली आणि अनेकांचे मेसेज आले.खरंतर पक्षाचं काम करत असताना आपण जिल्ह्यात काम करतो किंवा महाराष्ट्रात काम करतो यापेक्षा आपण पक्षाचे काम करतो याचा अभिमान नेहमीच होत असतो. माझ्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत पक्षाने न मागितलेली जबाबदारी अचानकपणे दिली याबद्दल काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करते. आजपर्यंत महिला काँग्रेस कमिटी तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीवर काम करत असताना अनेक अडचणीना सामोरे जाऊन पक्षांमध्ये स्थान टिकवताना कुठेतरी आपल्या पेक्षा धनाने अधिक संपन्न असलेल्या किंवा खोटा दिखावा करणाऱ्या लोकांचीच वर्णी लागते असा समज असतो पण काँग्रेस पक्षाने जाहीर झालेल्या यादीतून खऱ्या कार्यकर्त्यांची दखल ही त्यांच्या कार्यातून, कुठचीही शिफारस न देता घेतली जाते हे काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे.पक्षाने ज्या पदाची जबाबदारी आज माझ्यावर सोपवली आहे ती जबाबदारी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पार पाडण्याचा यथाशक्ती प्रयत्न करेन आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे विचार आणि काँग्रेस पक्षाने आजवर केलेले काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. पक्षांमध्ये काम करत असताना सर्वोच्च पद हे कार्यकर्ता असते अशी शिकवण आमच्या बाबांनी म्हणजेच दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे साहेब यांनी आम्हाला दिली आणि त्याच शिकवणीचे पालन आम्ही आजवर केले. शाम म्हात्रे साहेबांचे निधन झाले त्यावेळी देखील श्याम म्हात्रे साहेबांकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हेच पद होते त्यामुळे काय मिळाले नाही त्यापेक्षा म्हात्रे साहेब ज्या पदावरून त्यांचा प्रवास संपवून गेले तिथूनच पुनश्च काम करण्याची संधी मला मिळाली याचा आनंद जास्त आहे.सदर यादीमध्ये नमूद केलेल्या सर्वच महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणी मधील सदस्यांचे मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करते तसेच सर्वांनाच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते असे मनोगत श्रुती म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.गोर गरिबांच्या प्रश्नाची उत्तम जाण , उत्तम नेतृत्व, चारित्र्य संपन्न समाजसेवी व्यक्तिमत्व, लढाऊ आक्रमक बाणा, उत्तम वक्ता, प्रवक्ता, कुशल संघटन, उत्तम जनसंपर्क, संप आंदोलन उपोषण यशस्वी करण्याचे कौशल्य, सर्वच राजकारणी यांच्याशी उत्तम संपर्क, पक्षाचे विचार व तत्वे यांचा उत्तम अभ्यास, सत्य व वस्तूस्थितीला अनुसरून वर्तन हे सर्व श्रुती म्हात्रे यांच्या जमेच्या बाजू आहेत.हे सर्व गुण, कला कौशल्य श्रुती म्हात्रे यांच्यात आहेत. हा वारसा, हे कौशल्य श्रुती म्हात्रे यांना त्यांचे वडिल दिवंगत काँग्रेस नेते शाम म्हात्रे यांच्याकडुन वंशपरंपरागत मिळाल्याने श्रुती म्हात्रे यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कला कौशल्यांचा खूप मोठा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे. श्रुती म्हात्रे यांच्या सचिव पदाच्या निवडीने पक्ष संघटना अजून मजबुत होणार असून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचणार आहेत. यासाठी श्रुती म्हात्रे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.श्रुती म्हात्रे यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रुती म्हात्रे यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.