खिडूकपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; जनसंपर्क कार्यालयाचेही उदघाटन
पनवेल (प्रतिनिधी) प्रभुदास उर्फ आण्णा भोईर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरु ठेवावे असे गौरवोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. यावेळी रुग्णवाहीका लोकार्पण तसेच प्रभुदास भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या हस्ते लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला खिडूकपाडा येथे करण्यात आले.
प्रभुदास भोईर यांनी अल्पावधीतच अनेक प्रकारचे उपक्रम राबविले. त्यांनी दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम राबविले. तसेच इतर समाजपयोगी कार्यक्रमातून त्यांनी समाजाची सेवा केली आहे. कळंबोली स्टील मार्केट परिसरात खिडूकपाडा हे गाव येत आहे. तसेच याठिकाणी रहदरीच्या दृष्टीने वारंवार अपघात होत असतात. अशावेळी जवळच एखादी रुग्णवाहीका असावी, जेणेकरून अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचविता येऊ शकतील, या सामाजिक भावनेतून प्रभुदास भोईर यांनी रुग्णवाहीका उपलब्ध करून तिचे लोकार्पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.