पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने शहरात हातगाड्यांचा सुळसुळाट
नविन पनवेल-वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत हातगाड्या नविन पनवेल शहरात दिवसेंदिवस वाढत आहे.हप्तेखोर पालिका अधिकारी व हप्तेखोर अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांच्या आशीर्वादाने शहरात हातगाड्यांची संख्या वाढत आहेत.नविन पनवेल रेल्वेस्थानक परिसरात आधिच दुचाकी वाहनाने रस्त्यावर बेकायदेशीर पार्क केल्याने रस्ते अडवले जात असताना दुचाकी वाहनांपुढे या हातगाड्या सायंकाळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहतूक कोंडी करत असतात.या हातगाड्यांच्या समस्येने येथील रहिवासी , वाहनचालक त्रस्त झालेले असताना महापालिकेचे आयुक्त मात्र सुस्त बसले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे .शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पोस्ट आॕफीस लगतचे रस्ते ,रेल्वेस्थानक परिसरातील सेक्टर 16,17,15ए, या रस्त्यांवर अतिक्रमणचा विळखा पडला आहे .पालिकेत गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट असताना देखील नविन पनवेलमध्ये राजरोसपणे अतिक्रमणे उभी राहत आहे .दररोज कोठेतरी टपरी, हातगाडी,पत्राचे शेड, झोपडपट्टया उभ्या राहत आहे .दुकानदारांनी देखील दुकाने वाढवत थेट फूटपाथ ,रस्त्यावर दुकाने मांडली आहेत .हे सर्व डोळ्यासमोर होत असताना पालिकेचे ड प्रभाग अतिक्रमण विभागातील अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे यामागचे गोडबंगाल नेमके काय असा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत . तसेच पालिकेकडून कारवाई करताना भेदभाव केला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे .काही भागात कारवाईच होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या व सत्ताधारी यांच्या विरोधात नागरिकांमध्ये चिड निर्माण होत असून त्याचा राग नागरिक पालिका निवडणुकीच्या मतपेटीतून व्यक्त करणार असल्याचे बोलले जात आहे . शहाराच्या विकासासाठी कररुपाने महत्त्वाचा हातभार लावणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी मोकळे रस्ते ,वाहने उभी करण्यासाठी पार्कींग व्यवस्था, सार्वजनिक बससेवा या मूलभूत सोयीसुविधा देण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आलेले दिसत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. सिडकोचे नियोजित शहर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या व येथील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने बकाल शहर म्हणून ओळख निर्माण होत आहे.