महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्व्रभूमी असलेल्या घनश्याम भोईर याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी
पनवेल/ प्रतिनिधी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील विचुंबे येथील निवृत्त अंगणवाडी सेविका नलिनी भाऊ पाटील ह्या उदर्निवाहासाठी किराणा दुकान चालवत आहेत गावगुंड घनश्याम बापू भोईर याला मोफत सिगारेट दिली नाही म्हणून त्याने प्राणघातक हल्ला करीत भाऊ पाटील व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करीत भाऊ पाटील यांची पत्नी नलिनी पाटील हिच्या डोक्यात ट्रे आपटून जीव घेणा हल्ला केला आहे याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात घनश्याम बापू भोईर याच्या विरोधात भा दं स कलम ११८ (1 ),११८ (२)११५ (२) ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तीन दिवस उलटूनही पोलीस हल्लेखोरास अटक करू शकले तसेच हि कलमे समाधानकारक नसल्याने भाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे घनश्याम भोईर याच्यावर कठोर कलमे कारवाई करावी अशी तक्रार देखील दाखल केली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे कि रविवार दिनांक १३ जुले रोजी संध्याकाळी ८.३० च्या घनश्याम बापू भोईर ,जयेंद्र पाटील ,राजेश म्हात्रे रिक्षाने भाऊ पाटील यांच्या दुकानात आले त्यावेळी घनश्याम रिक्षात बसून होता व जयंद्र व राजेश याने सिगारेट मागितली तेव्हा मी तुम्हाला जयंद्र व राजेश यास सिगारेट देतो मात्र घनश्याम याला सिगारेट देणार नाही तो अनेक वेळा येऊन पैसे न देता सामान घेऊन जातो असे भाऊ पाटील बोलले असता ते घनश्याम याने ऐकून दुकानात आला व भाऊ पाटील यास शिवीगाळ करीत दुकानासमोरील प्लास्टिक ची बादली फेकून मारली आणि जोरजोरत शिवीगाळ करीत असल्याने भाऊ पाटील याची पत्नी नलिनी व सून सुजाता या दोघी दुकानात आल्या भाऊ पाटील याच्या सुनेने सुजातानाने घनश्याम याला शिविगाळ करू नको निघून जा इकडून असे सांगितले असता त्याने पत्नी नलिनी पाटील व सून याना दोघीना अर्वाच्य शब्दात घनश्याम शिवीगाळ करू लागला व दुकानासमोर ठेवलेले दुधाचा ट्रे नलिनी पाटील यांच्या डोक्यात मारून तिला गंभीर दुखापत केली तिला साधारण २७ टाके डोक्यात पडले असून नलिनी पाटील ,मला तसेच माझी सून याना गंभीर मारहाण करून दुखापत केली असल्याची फिर्याद भाऊ दगडू पाटील यांनी केली आहे .
घनश्याम भोईर हा गुन्हेगारी पार्शवभूमी असलेला गुंड असून गावात दहशत पसरवणे ,मारझोड करणे ,दमदाटी करणे कोयत्याने वार करणे अशा स्वरूपाचे त्याचे वर्तन असून त्याच्यावर या अगोदर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी घनश्याम याच्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असला तरी ज्या स्वरूपाची गंभीर मारहाण,महिलांना शिविगाळ करणे त्यांना मारहाण करणे असा प्रकार करून देखील योग्य ती कलमे लावली गेली नाहीत तरी आपण या बाबत योग्य ती दखल घेऊन घनश्याम बापू भोईर याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पोलीस आयुक्त नवी मुंबई सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई ,यांचेकडे लेखी अर्जाने केली आहे .