जो काम करेल तो नक्कीच पुढे जाईल-* *मा.खासदार रामशेठ ठाकूर
पनवेल : जो काम करेल तो पुढे जाईल आणि काम करणाऱ्याला संधी नक्की मिळते. जे एम म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे हे समाजकारण करत असून त्यांच्या या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते मा.खासदार लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर यांनी केले. विश्राळी नाका, गुरु शरणम इमारत, पनवेल येथे भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार श्री.प्रशांत ठाकूर, आमदार श्री.महेश बालदी, आमदार श्री.विक्रांत पाटील, मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, म्हाडाचे मा. अध्यक्ष श्री.बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, श्री.अतुल दि.बा.पाटील, मा.सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, मा.नगराध्यक्ष श्री.संदीप पाटील, श्री मा.नगरसेवक गणेश कडू यांच्यासोबत सर्व सन्माननीय नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी रामशेठ ठाकूर आणि जे.एम म्हात्रे ही जोडी लोकं ओळखत होती आता प्रितम म्हात्रे आणि परेश ठाकूर ही जोडी ओळखली जाईल असे मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी खालापूर, पनवेल, उरण, रायगड ई. ठिकाणाहून कुठूनही नागरिक आले तरी नागरिकांना या कार्यालयात सन्मानाने वागणूक मिळेल. कोणाची अडकलेले कामे असतील तर ती नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगितले.
जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अनेकांची उपस्थिती पाहून ही नक्कीच मोठ्या यशाची नांदी आहे . आगामी महापालिकेच्या निवडणुकीत 78 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले. यावेळी जनसेवा करण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले.
आमदार श्री.विक्रांत पाटील यांनी आपल्या पाठीशी मजबुतीने उभे राहणारे लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर आहेत. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे या भूमिकेत ते नेहमीच असतात. जे एम म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितम म्हात्रे हे अनेक वर्ष सामाजिक काम करत आहेत. त्यामुळे ते अन्य कोणत्या पक्षाचे वाटतच नव्हते तर ते आपलेच वाटत होते असे आ. विक्रांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत तसेच भारतीय जनता पार्टी ही देश प्रेमासाठी काम करणारी पार्टी आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी असणाऱ्या असंख्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन आ. विक्रांत पाटील यांनी केले.
पक्षप्रवेश
यावेळी कामोठे येथील अल्पेश माने प्रमुख संघटक शेकाप, सुरेश खरात कामोठे शहर अध्यक्ष व्यापारी सेल, सौ.शुभांगी खरात, यांच्यासोबतच खांदा कॉलनी येथील शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष श्री.जयंत भगत, यांच्यासोबत त्यांच्या संघटनेच्या असंख्य सहकाऱ्यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे कामोठे आणि खांदा कॉलनी येथे श्री.प्रितम म्हात्रे यांच्या प्रवेशानंतर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे.
चौकट
भाजपचे प्रितम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन असताना देखील ते खुर्चीवर बसले नव्हते. ते बाजूला उभे होते.यावेळी मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी काम करणाऱ्याला खुर्चीची गरज नसते असे प्रितम म्हात्रे यांच्याकडे बघून सांगितले.