पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्यावतीने अविनाश कोळी यांचा सत्कार
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी संघटन कौशल्य असलेले अविनाश कोळी यांची पुनर्निवड झाल्यानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्यावतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अविनाश कोळी हे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार असून, त्यांनी या मंचाच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांच्या निवडीमुळे मंचाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास मंचाचे ज्येष्ठ सल्लागार माधव पाटील, सल्लागार विवेक पाटील, अध्यक्ष मंदार दोंदे, सरचिटणीस हरेश साठे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, कार्यकारिणी सदस्य नितीन कोळी, प्रवीण मोहोकर, राजू गाडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सत्कार स्वीकारताना अविनाश कोळी म्हणाले, "पत्रकारिता आणि राजकारण यांचे अतूट नाते आहे. मी स्वतः पत्रकार म्हणून काम करून आज राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. पत्रकारितेतील अनुभवामुळे संघटनात्मक कामात नेहमीच मदत झाली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाशी असलेली माझी नाळ कायमची जोडलेली आहे. आजचा हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे असे सांगत आपल्या सहकाऱ्यांकडून होणारा हा सत्कार मला यापुढेही प्रेरणा देणारा ठरणार आहे. राजकीय जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक कार्य महत्वाचे असते त्याची सांगड घालत माझ्यावर टाकलेला विश्वास पुन्हा सार्थ करण्यासाठी कार्यरत असल्याचेही त्यांनी सत्काराच्या निमित्ताने अधोरेखित केले.
Popular posts
रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ लोकनेते रामशेठ ठाकूर व सौ. शकुंतला ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य सत्कार
इमेज
*मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण* *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
इमेज
शेकापक्षाला मोठा हादरा शेकापचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात महाप्रवेश
इमेज
आजही मी शेकापक्षातच ; महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहे : मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे
इमेज