जेएनपीटीच्या कामगारांसाठी महेंद्रशेठ यांची प्रशासनासोबत चर्चा
उलवे, ता. १४ : जेएनपीटीत गेल्या २५-३० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने भूमिपुत्र कामगार काम करतात, पण त्यांना कमी पगारात राबवून घेतले जाते आणि आजही वेळेवर पगार मिळत नाही, अशी व्यथा या कंत्राटी कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडे साधारण पंधरा दिवसांपूर्वी मांडली होती. तेव्हा कंत्राटी कामगार महेंद्रशेठ यांना म्हणाले होते, "आम्ही अनेकांच्या नेतृत्वाखाली काम केले, पण आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे महेंद्रशेठ तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, तुम्हीच आमचे नेतृत्व करा, आम्ही आपल्यासोबत आहोत." त्यामुळे न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सुमारे ४०० कंत्राटी कामगारांचे नेतृत्व स्वीकारले आणि कामगारांना न्याय देण्याचे मान्य केले. त्यामुळेच तातडीने आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मंगळवारी (ता.१३) जेएनपीटीच्या कंत्राटी कामगारांसाठी पुढाकार घेऊन प्रशासनासोबत चर्चा केली. यावेळी जेएनपीटीच्या महाप्रबंधक मनीषा जाधव यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला आणि लवकरात लवकर कामगारांचे प्रश्न सोडवा, असे महेंद्रशेठ घरत यांनी मनीषा जाधव यांना सांगितले. त्यावेळी कंत्राटी कामगारांचा पगार वेळेवर होईल, तसेच इतर मागण्यांवर तोडगा काढू, असे आश्वासन मनीषा जाधव यांनी दिले. यावेळी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेत पदार्पण केलेले हरेश मढवी, मिन्नाथ भोईर, अविनाश घरत, संजय घरत, नंदू कोळी, अजय पाटील, जितू म्हात्रे, सचिन भोईर, योगेश कोळी, किरण भोईर, योगेंद्र ठाकूर, दत्ता कोळी, जालिंदर पाटील, कल्पेश नारंगीकर, नितीन नाईक, राकेश कडू, जयेश पाटील, जयेश घरत, ज्योत्स्ना ठाकूर, बाळकृष्ण मोकल, पुष्पा पाटील, विलास कडू, सुवर्णा कडू, शिल्पा म्हात्रे, सुषमा म्हात्रे, जयश्री ठाकूर, प्रतिभा कडू, नलिनी तांडेल, संदीप घरत, सुभाष गावंड, विनया मढवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Popular posts
शेकापक्षाला मोठा हादरा शेकापचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात महाप्रवेश
इमेज
रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ लोकनेते रामशेठ ठाकूर व सौ. शकुंतला ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य सत्कार
इमेज
आजही मी शेकापक्षातच ; महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहे : मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे
इमेज
आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज* *“शून्य अपघात हे आपले ध्येय”* *- आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी
इमेज
*मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण* *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
इमेज