राष्ट्र सेविका समिती रायगड जिल्ह्याचे पनवेल येथे सघोष पथसंचलन
• Raju pandharinath gade
पनवेल (प्रतिनिधी) समरस, सुखमय व सुसंघटित समाजनिर्मितीसाठी ‘राष्ट्र सर्वोपरी’ हे बीज प्रत्येक कुटुंबात रुजणे आवश्यक आहे. यासाठी सक्षम मातृशक्तीचे संघटन करण्याचे कार्य गेली नऊ दशके राष्ट्र सेविका समिती सातत्याने करत आहे. या कार्याचेच प्रत्यक्ष दर्शन घडवणारा उपक्रम म्हणजे सघोष पथसंचलन असून राष्ट्र सेविका समिती रायगड जिल्हा यांच्या वतीने रविवार दिनांक १८ जानेवारी रोजी पनवेल शहरात सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संचलनाची सुरुवात सायंकाळी ४. ३० वाजता गुजराती शाळा, पनवेल येथून होणार आहे.हे पथसंचलन गुजराती शाळा येथून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डावीकडे वळून विसावा हॉटेल, ज्योती आहार भवन, कायस्थ हॉल, विरुपाक्ष मंदिर येथून पुढे जात कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा येथे वळेल. त्यानंतर क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृह, शिवाजी महाराज चौक मार्गे पुन्हा गुजराती शाळा येथे संचलनाची सांगता होईल.या सघोष पथसंचलनाच्या स्वागतासाठी तसेच ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्र सेविका समिती, रायगड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.