नविन पनवेल स्टेशन परिसरातील पंचशील नगर झोपडपट्टीला भीषण आग
पनवेल -
नविन पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील पंचशील नगर झोपडपट्टीमध्ये गुरुवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता सिलिंडरचा स्फोटामुळे आग लागून चार ते पाच झोपड्या खाक झाल्याचे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे. आगीचा भडका मोठ्या प्रमाणात उडाल्याने पंचशील नगर झोपडपट्टीच्या वरुन महावितरणची उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या काही तारा तुटल्या गेल्या.यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडला.आग दुपारच्या वेळेस असल्याने नागरीकांनी लगेच धावपळ केली.तसेच वाहतूक पोलिसांनी अभ्युदय बँक ते रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्ते बंद केले होते.यामुळे येथे कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.येथिल आग लागलेल्या झोपडपट्टीमध्ये लाकडाचे सामान मोठ्या प्रमाणात होते.यामुळे आगीचा भडका मोठ्या प्रमाणात झाला.तसेच झोपडपट्टी मागे नविन पे अँड पार्किंग मधील सात ते आठ दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.आगीची माहिती मिळतच अग्निशमन दलाने वेळीच येऊन पाण्याच्या फवारे मारुन आगीवर नियंत्रण मिळून आग विझली.या आगीमुळे महापालिकेच्या कारभारावर काही प्रश्न निर्माण होत आहेत उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली झोपडपट्ट्या असणे हे अत्यंत धोकादायक आहे आणि यामुळे आग लागण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण या वाहिन्यांमधून प्रचंड वीजप्रवाह असतो; त्यामुळे शॉर्ट सर्किट किंवा वाहिन्या तुटल्यास ज्वलनशील वस्तूंच्या संपर्कात येऊन मोठी आग भडकू शकते, अशा ठिकाणी झोपडपट्ट्या असल्याने जीवितहानीचा धोका असतांना या पंचशील नगर झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने उभारण्यात आली आहेत.येथे भंगार व पेपरच्या रद्दीचे ,स्कुल बँग,गँरेजची दुकाने थाटली आहेत.येथील जागेचा गैरवापर होत असल्याने धोका अधिक वाढतो, त्यामुळे महापालिकाने तातडीने येथील दुकानांवर कारवाई करावी .अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.महापालिकेचे पहिले तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी येथिल झोपडपट्टीमधील सर्व बेकायदेशीर दुकाने बंद केली होती.आता महापालिकेच्या आशिर्वादाने या पंचशील नगर झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने वाढत आहे.