जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधन
• Raju pandharinath gade
मुंबई - साराभाई वर्सेस साराभाई' फेम ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. निर्माते-दिग्दर्शक अशोक पंडित यांनी किडनी निकामी झाल्यामुळे सतीश शाह यांचं निधन झाल्याची दुःखद माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सतीश शाह यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. "सतीशजी तुम्ही माझ्या पहिल्या सिनेमात माझे ऑनस्क्रीन वडील होतात... मी खूप नशीबवान होते म्हणून मला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आज खरंच खूप दुःख होतंय.... तुमच्या कुटुंबीयांबरोबर माझ्या सहवेदना आहेत" असं जिनिलीया देशमुखने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे."सतीश सर... तुमच्यामुळे कायम सेटवरचं वातावरण प्रसन्न असायचं. तुम्ही 'साथिया' या माझ्या पहिल्याच सिनेमात ऑनस्क्रीन वडिलांची भूमिका केली होती. तुमचा शांत, हसतमुख स्वभाव कायम लक्षात राहील. तुम्ही साकारलेल्या इंद्रवर्धन साराभाई या भूमिकेवर संपूर्ण देशाने प्रेम केलं. तुमच्या आठवणी सदैव आमच्या स्मरणात राहतील... तुम्हाला कायम मिस करू ! ओम शांती" असं म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉयने सतीश शाह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
