सिडकोचे कार्यकारी अभियंता श्री.विश्वनाथ गोविंद पांडुळे यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप
पनवेल-औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयातील गेल्या 30 वर्षे 6 महिन्यापासून यशस्वीपणे सेवा देणारे निष्कलंक कार्यकारी अभियंता श्री. विश्वनाथ गोविंद पांडुळे हे बुधवारी दि. 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त शनिवार दिनांक 3 जून रोजी सायंकाळी जागृती प्रकल्प नविन पनवेल येथे छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला होते. यावेळी कार्यालयातील, कर्मचारी,नातेवाईक स्नेह, प्रेमपूर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी पनवेल व्हि.के.हायस्कूल येथिल बी.पी.म्हात्रे सरांच्या हस्ते सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता श्री .विश्वनाथ गोविंद पांडुळे यांचा सत्कार व गुण गौरव करण्यात आला.
यावेळी श्री. विश्वनाथ गोविंद पांडुळे यांनी आपल्या जिवनातील अनमोल आठवणी उजाळा दिला.बी.पी.म्हात्रे सरांच्या हस्ते माझा सत्कार होत असल्याने आनंद व्यक्त केला.तसेच कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर, मित्रवर्ग, सहकारी अधिकारी /कर्मचारी तसेच कुटुंबातील सदस्यांनी श्री. श्री.विश्वनाथ गोविंद पांडुळे यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
मनोगत व्यक्त करताना प्रामाणिकपणा, सचोटी, जिद्द आणि धैर्य या सर्व गोष्टीना एकत्रित करून माणूस नक्कीच शिखर कसे गाठू शकतो हे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती आणि सुत्रसंचालन श्री. उद्भव काळापहाड़ (अहमदनगर) यांनी केले, तर आभार प्रदर्शन साहेबांच्या स्नुषा सौ. अश्विनी हर्षल पांडुळे यांनी अतिशय मोजक्या शब्दात पार पाडले.