जेएनपीए येथे योग दिनानिमित्त “योग संगम” कार्यक्रमाचे भव्य आयोजन;
मुंबई, दि. १९ : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रासाठी नोडल समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आरआरएपी – केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, वरळी, मुंबई यांच्या तर्फे “योग संगम” या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन २१ जून २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता, जेएनपीए टाऊनशिप, सीआयएसएफ कॅम्पस, उरण, नवी मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर .गोविंद रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) तसेच भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमात सुमारे दहा हजार योगप्रेमी सहभागी होण्याची शक्यता असून, आयुष मंत्रालयाचे महासंचालक प्रो. रवीनारायण आचार्य यांची उपस्थिती राहणार आहेत. योग दिनानिमित्त आयोजित होणारा हा उपक्रम आरोग्यप्रद जीवनशैलीचा संदेश देणारा ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना टी-शर्ट, रेनकोट, योगा मॅट मोफत वितरित करण्यात येणार आहे. असून अल्पपोहाराची ही सोय केली आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली. “योग संगम” कार्यक्रमातून महाराष्ट्रात योग आणि हरित उपक्रमांना चालना यावर्षी ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने १० प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यात “योग संगम” हे एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत “हरित योग” आणि “योगा पार्क” या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वृक्षारोपणालाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून, केवळ जे.एन.पी.ए.मध्ये १ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. राज्यभरात योगप्रसारासाठी व्याख्याने, शिबिरे आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. आर.आर.ए.पी. संस्थेने या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन करत योगाची व्यापक घडी घातली असून, ‘योग संगम’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, निरोगी भारताच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे, असे मत संस्थेचे सहायक संचालक डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केले. 0000 मोहिनी राणे/ससं/
Popular posts
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमलेगुजरातला काढलेली जाहिरात रद्द, नोकर भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्याचे लेखी स्वरूपात आश्वसन.
इमेज
वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार - भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी
इमेज
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
इमेज
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे
इमेज
डीएवी पब्लिक स्कूलमध्ये युनिट टेस्टसाठी मराठीचा समावेश; भाजपच्या पाठपुराव्याला यश
इमेज