नवीमुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का?
उलवे, ता. २४ : लोकनेते दि. बा. पाटील शेवटच्या श्वासापर्यंत न्याय हक्कांसाठी लढले. देशपातळीवरील गोरगरिबांसाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या नेत्यांमध्ये ते आहेत. उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे ऐतिहासिक आंदोलन झाले, त्यांचे ते प्रणेते आहेत. त्या आंदोलनात पाच हुतात्मे झालेत. त्यामुळे यांची जाण ठेवून तरी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का? दिबांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे. म्हणजे ते जाऊन एक तप झाले. सरकार किती दिवस चालढकल करणार, असे रोखठोक मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी दिबांच्या स्मृतीस अभिवादन करताना व्यक्त केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत काॅ. भूषण पाटील जासई येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांना महेंद्र शेठ घरत यांनी काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. दि. बा. पाटील साहेब ही आमची अस्मिता आहे तिला नख लावण्याचे धाडस कुणी करू नये, असे मतही महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मंगळवारी (ता. २४) लोकनेते दि.बा. पाटील साहेबांना सकाळी ९ वाजता जासई येथे अभिवादन केले. यावेळी दिबांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण केले. त्यानंतर त्यांनी पनवेल येथील संग्राम बंगला येथे दिबांना अभिवादन केले. यावेळी दिबांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी अतुल पाटील, मनीषा पाटील आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
Popular posts
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे च्या दणक्याने जे एम बक्षी पोर्ट नमलेगुजरातला काढलेली जाहिरात रद्द, नोकर भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्याचे लेखी स्वरूपात आश्वसन.
इमेज
वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार - भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी
इमेज
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
इमेज
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे
इमेज
डीएवी पब्लिक स्कूलमध्ये युनिट टेस्टसाठी मराठीचा समावेश; भाजपच्या पाठपुराव्याला यश
इमेज